
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार क्रृष्णमुर्ती सुब्रमनियन यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तसेच शिक्षण क्षेत्रात पुन्हा काम करायचे असल्याने आपण राजीनामा दिल्याचे सुब्रमनियन यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
I have decided to return back to academia following the completion of my 3-year fulfilling tenure. Serving The Nation has been an absolute privilege and I have wonderful support and encouragement. My statement: @PMOIndia @narendramodi @FinMinIndia @nsitharamanoffc @PIB_India pic.twitter.com/NW5Y64kxJ6
— K V Subramanian (@SubramanianKri) October 8, 2021
”मी शिक्षण क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचा मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून माझ्या कार्यकाळाची तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. ” असे त्यांनी ट्विट केले आहे. सुब्रमनियन यांनी 7 डिसेंबर 2018 साली मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता. अद्याप केंद्र सरकारने पुढील आर्थिक सल्लागाराबाबत घोषणा केलेली नाही.



























































