पाकिस्तानमधील विद्यार्थीनी ड्रॅग्जच्या विळख्यात, केले असे कृत्य व्हिडीओ होतोय व्हायरल

एकिकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असताना दुसरीकडे तिथली तरुणपिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाहोरच्या एका प्रसिद्ध शाळेतील चार विद्यार्थीनिनी एका मुलीची चांगलीच धुलाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलीसांनी या व्हिडीओचा तपास केला असता ड्रग्जचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी तक्रार केली असता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मुलींच्या फ्रीस्टाईलचा हा व्हिडिओ पंजाबमधील लाहोरचा आहे. लाहोरच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये असलेल्या अमेरिकन इंटरनॅशनल शाळेमध्ये 16 जानेवारीला ही घटना घडली आहे. चार मुलींनी एका मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत चार मुली एका मुलीला जमिनीवर झोपवून तिचे केस पकडून तिला मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. मारहाण करणाऱ्या मुली पीडित मुलीला शिवीगाळ करतात आणि तिला सॉरी म्हणायला सांगतात. पीडित मुलीने आरोपी ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ बनवला होता.

पीडित मुलीचे वडील इम्रान युनूस यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, पीडितेने शाळेच्या कॅम्पसमध्ये चार मुली ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ बनवला होता. याचा राग येऊन आरोपी विद्यार्थिनींनी पीडित मुलीला बेदम मारहाण केली होती. आरोपींपैकी एक बॉक्सर असून तिने मुलीच्या तोंडावर बुक्के मारले. इतर मुलींनीही पीडित मुलीला लाथा मारल्या. एवढेच नाही तर एका मुलीने पीडितेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. मारहाणीमुळे मुलीच्या चेहऱ्यावर जखम झाली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर लाहोर आणि पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाहोरमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्जचा वापर वाढत आहे.