
राजू हिंगे, पुणे
पुण्यामध्ये पु.ल.देशपांडे उद्यान परिसरात मर्निग वॉकला निघालेल्या नागरिकांना 4 फूट पाण्याचे तळे दिसले. रात्रीपर्यंत कोरडाठाक असलेला हा परिसर तळ्यात रुपांतरीत कसा झाला असा अनेकांना प्रश्न पडला होता. सामनाच्या प्रतिनिधींनी याबाबत माहिती घेतली असताना त्यांना कळाले की व्हॉल्व्ह बिघडल्याने 1600 मिलिमीटर व्यासाच्या पाईपमधून लाखो लिटर पाणी वाहून गेले होते.
पुण्यामध्ये खडकवासला धरणातील पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात पुन्हा एकदा जुंपली आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने व्हॉल्व्ह बंद करायचं ठरवलं होतं. सकाळी साडेसहाच्या सुमारास हे काम सुरू असताना काहीतरी बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी काही कळण्याच्या आताच रस्त्यावर आले. अचानक आलेल्या या पाण्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.




























































