
सामना प्रतिनिधी, मुंबई
चिपळूण तालुक्यात परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. शनिवारी दुपारी तीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावर ही घटना घडली. जगबुडी आणि वशिष्ठी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड आणि चिपळूण शहरात पूर आला. शनिवारी दुपारी अडीच वाजता परशुराम घाटात दरड कोसळली.































































