फोन उचलला नाही म्हणून पट्ट्याने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोन केला असता तो का उचलला नाहीस आणि परत फोन का केला नाहीस म्हणून बेल्टने मारहाण केल्याची घटना लातुरातील आर्वी कॉर्नर येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनंत पांडुरंग कांबळे (रा. आर्वी) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, किशोर उत्तम सूर्यवंशी आणि त्याच्यासोबत असणार्‍या इतर दोघांनी संगनमत करून त्याला तू माझा फोन का उचलला नाहीस, फोन का करत नाहीस, असे म्हणून शिवीगाळ केली. मी कामात होतो त्यामुळे फोन उचलला नाही, असे सांगत असताना त्यांनी संगनमताने शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली शिवाय कमरेचा बेल्ट काढून डोक्यात, पाठीवर मारहाण करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेला फिर्यादीच्या मित्रासही शिवीगाळ करून मारहाण केली. तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.