घरफोडी करून एक लाख ५ हजाराचा ऐवज पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

शिरूर अनंतपाळ येथील भोजराज नगर भागात घरफोडी करून चोरट्याने रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५ हजाराचा ऐवज पळवला आहे.

या प्रकरणी अनिल भिमाशंकर हसबे रा.भोजराज नगर शिरूर अनंतपाळ यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हसबे यांच्या घराच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ९० हजार रुपये, ५ ग्रॅम सोन्याचे झुमके (किंमत १४,००० रुपये), १ तोळे चांदीचे जोडवे (किंमत १००० रुपये) असा एकूण १,०५,००० रुपयाचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.