ऍपवरून शिका योगाभ्यास

योगाचे महत्त्व जगभरातील लोकांना पटू लागले आहे. तज्ञ, अनुभवी प्रशिक्षक आणि  योगगुरू यांच्याकडून योग शिवण्याचा कल दिसून येतो. मात्र गेल्या वर्षापासून आपण कोरोना महामारीला तोंड देत आहोत, लॉकडाऊनमध्ये सारे घरात अडकलो होतो. योगाचे वर्गही बंद होते. त्यामुळे लोक घरातून योगाभ्यास करत होते. अनेकांनी ऍप्सची मदत घेऊन अभ्यास सुरू ठेवला. काही ऍप्सनी योग ट्रेनरसारखी भूमिका पार पाडलेली दिसत आहे. असे ऍप डाऊनलोड करण्याचे प्रमाण जास्त आहे. अल्ट्राह्युमन, योगीफाय, इंडेल आदी ऍप्स उपलब्ध आहेत. ‘काल्म’ ऍपमध्ये मेडिटेशन, प्राणायाम, स्ट्रेचिंग एक्सरसाईज, रिलॅक्सिंग म्युझीक यांचा समावेश आहे. ‘योगा गो’सारखे ऍप  कस्टमाईज फिटनेस आणि वजन कमी करण्याचे प्लॅन देतात. त्यावर सात ते 30 मिनिटं करता येतील असे साधे योगा कर्कआऊट प्लॅन देण्यात आले आहेत. ‘ऑरो’ ऍपवर तीन मिनिटांचे मेडिटेशन उपलब्ध आहेत. ‘आसन रिबेल’ ऍप डाऊनलोड करून वेट लॉस आणि मेडिटेशन करता येते.

आपली प्रतिक्रिया द्या