पाकिस्तान शैक्षणिक क्षेत्रातही दरिद्री, 75 टक्के मुलांना लिहता, वाचता येत नाही

648

पाकिस्तान आर्थिक स्थितीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही दरिद्री असल्याचे समोर आले आहे. येथील 75 टक्के मुलांना एक अक्षरही लिहता वाचता येत नसून त्यातील काहीजणांनी कधी शाळेची पायरीही चढलेली नाही. शिक्षण न घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणिय आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे ही सर्व मुलं मुली 5 ते 10 वर्ष वयोगटातील आहेत. यातील काहीजणांना एक अक्षरही वाचता वा लिहता येत नाही. एवढेच नाही तर पुस्तक सरळ आहे की उलट हे देखील त्यांना कळत नाही. असा खुलासा विश्व बँकेने आपल्या अहवालात केला आहे. इस्लामाबादमधील आजम युनिव्हर्सिटीत मुलींना शिक्षणाचे महत्व समजावे यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्व बँकेचे संचालक जे मे सावेद्रा यांनी अहवाल सादर केला. त्यात पाकिस्तानमधील शिक्षण व्यवस्था डळमळीत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच दक्षिण आशियात दहा वर्षापर्यंतचे 58 टक्के मुलं ‘लर्निंग पॉवर्टी‘चे बळी झाल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर मुलांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगणे व त्यांना शाळेपर्यंत आणणे गरजेचे असल्याचेही सावेद्रा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या