एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी…आणखी 20 टक्के वाढीची शक्यता…जाणून घ्या तज्ज्ञांची मते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलआयसीच्या आयपीओबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, या शेअरचे लिस्टिंग झाल्यानंतर गुंतवणूकदारांची निराशा झाली. लिस्टिंगनंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत होती. मात्र, आता या शेअरमध्ये तेजी येत असून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने याला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये आणखी 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

शेअर बाजार सुरू झाल्यावर दुपारी 1 वाजेपर्यंत या शेअरमध्ये 2.25 टक्के तेजीने 708 रुपयांवर व्यवहार करत होता. दिवसाच्या कारभारात यात 3 टक्क्यांची वाढ होत तो 712.50 रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवालने दिला आहे. या शेअरची किंमत 830 रुपयांपर्यंत पोहचले, असा त्यांचा अंदाज आहे. आगामी काळात या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

एलआयसीच्या मार्जिनमध्ये आगामी काळात रिकव्हरी होईल, असे ब्रोकरेज फर्मचे मत आहे. अजूनही एलआयसी विमा क्षेत्रआत प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे या शेअरच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे. ते त्यांच्या शेअरमध्येही दिसेल आणि या शेअरच्या किंमतीत वाढ होईळ, असे त्यांचे मत आहे.

एलआयसीच्या शेअर आता लाईफटाईम लोच्या वर पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी तो 650 रुपयांवर लाईफटाईम लोवर होता. त्या तुलनेत हा शेअर 9 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या या शेअरचा मार्केट कॅप 5 लाख कोटींपेक्षा कमी आहे. मोतीलाल ओसवाल सोबतच ब्रोकरेज फर्म Emkay Global नेही हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता. आगामी काळात हा शेअर 875 रुपयांपर्यंत पोहचेल, असा त्यांचा अंदाज आहे.