Tips – पावसाळ्याच्या दिवसात ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा म्हटले की आजार आलेच. परंतु आजारांपासून दोन हात लांब रहायचे असेल तर रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक. मात्र चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आहारात योग्य पदार्थांचा समावेश न केल्यास त्याचा शरिरावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे पावाळ्यात आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

बाहेरचे पदार्थ टाळा

पावसाळ्यात गरमागर भजी, पाणीपुरी, वडे, समोसे असे तळलेले पदार्थ खाण्याची तल्लफ येऊ शकते. परंतु या दिवसात बाहेरचे खाणे टाळा. असे पदार्थ शक्यतो घरीच तयार करण्याचा प्रयत्न करा.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी चांगल्या असतात. मात्र कोबी, पालक, फ्लॅावर यांसारख्या पालेभाज्या खाणे टाळा. कारण पावसाळ्यात पालेभाज्यामध्ये किडे-अळ्याचे येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मांसे आणि सी फूड

पावसाळ्यात समुद्रातील मासे आणि सी फूड खाणे शक्यतो टाळा. हा माशांचा प्रजननाचा काळ असल्याने अशा माश्यांच्या सेवनाने विविध आजार होऊ शकतो.

Tips : चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडल्या? ‘हे’ करा घरगुती उपाय

शिळे अन्न

पावसाळ्यामध्ये शिळे अन्न खाणे टाळावे. कारण आपण रात्री शिल्लक राहिलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो आणि सकाळी उठून खातो. पण 6 तासाहून जास्तवेळ फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्नात शरीराला अपायकारक असलेले विषाणू वाढीस लागतात. यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे.

काळे चणे खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

कार्बनेटेड पेय

पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होत असल्याने कार्बनेटेड पेये टाळणे कधीही चांगले. याच्या सेवनामुळे शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमता मंदावते, आणि यामुळे अपचन होते.