निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहात, आहारात त्वरित करा ‘या’ पदार्थांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली निद्रानाशाच्या समस्येने बरेच लोक त्रस्त असतात. कामाच्या बदलत्या वेळा, वाढता ताण, जंक फूडचे अतिसेवन, नैराश्य, शारीरिक आजारपण आणि वेदना, औषधांचे अति सेवन, भीती यामुळे बहुतांश लोकांना निद्रानाशाच्या समस्येचा सामना करावा लागतो, मात्र जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी सुधारल्या तर या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. याकरिता आहारात पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश केला, तर तुम्ही निरोगी राहू शकता आणि अनेक आजारांपासून दूर राहू शकता. पाहूया अपुऱ्या झोपेमुळे त्रस्त असल्यास आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते.

स्लीप फाउंडेशनच्या अहवालानुसार, असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते तसेच या पदार्थांमध्ये अशी अनेक पोषक तत्त्वे असतात जी झोपेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. या पदार्थांमध्ये अशी अनेक पोषक तत्व असतात, जे पदार्थ झोपेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. हे पदार्थ निद्रानाश किती प्रमाणात बरे करू शकतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास निश्चितच अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.

या पदार्थांचा आहारात समावेश करा

– किवी हे फळ अतिशय चवदार आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम आणि फोलेट असतात. झोपण्यापूर्वी किवी फळ खाल्ल्याने झोप चांगली लागते.
– टार्ट चेरीचा रस प्यायल्याने झोपेची समस्या दूर होऊ शकते. संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक दररोज दोन कप चेरीचा रस पितात त्यांना चांगली झोप येते.
– रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने चांगली झोप लागेल. त्यामुळे पचनक्रियाही सुधारायला मदत होईल.
– जे लोक मांसाहार करतात, त्यांच्या आहारात चरबीयुक्त माशांचा समावेश केला, तर झोपेचा दर्जा अनेक पटींनी चांगला होऊ शकतो. यामध्ये जीवनसत्त्व डी आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते.
– आहारात भाताचा समावेश केला तर चांगली झोप लागायला मदत होते. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शांत झोप लागायला मदत होते.