LIVE दूध आंदोलन: दुधाचे वॅगन अडवण्यासाठी राजू शेट्टी डहाणू स्थानकात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मुंबई

 

  • कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून दुध संकलित करून जात असलेला टेम्पो आंदोलकांनी शिये – भुये रोडवर अडवून दूधाचे कॅन रिकामे केले.

    • डहाणू स्काथानकात कार्यकर्ते अहमदाबाद मुंबई सेंट्रल पॅसेंजर समोर ट्रक वर उतरले, मात्र या ट्रेन ला दुधाचे वॅगन जोडले नसल्याने निदर्शनास येताच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली.

  • दूध उत्पादक शेतक-यांचे आंदोलन चियडण्याचा सरकारचा डाव. उद्यापासून जनावरे सोडून महामार्ग रोखणार – राजू शेट्टी
  • भुकटी बनवून करोडो रूपये कमवणा-यांवर सरकार मेहेरबान आहे. मात्र पण तोट्यात दूध विकणाऱ्या शेतक-यांना  लिटरमागे ५ रूपये भाव वाढवून मिळत नाही. – राजू शेट्टी

 

पहा व्हिडीओ –

  • गुजरातहून मुंबईला येणारे दुधाचे वॅगन अडवण्यासाठी खासदार राजू शेट्टी डहाणू स्थानकात दाखल.

raju-shetty-at-dahanu

  • जयसिंगपूरजवळ गोकुळ दूध संघाचा टँकर पेटविला. मंगळवारी रात्री उशीरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली-कोल्हापूर बायपास रस्त्यावरून जाणारा गोकुळ दूध संघाचा रिकामा टँकर दानोळी फाट्याजवळ पेटवून दिला.
  • जयसिंगपूर शहरातील सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील जनता विद्यामंदिरासमोर दुधाचा टेम्पो अडवून त्यातील दुधाने भरलेले वीस कॅन ओतून देण्यात आले.
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सूरू केलेले दूध आंदोलन अधिक चिघळताना दिसत आहे. जालन्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ वैजनाथ ढोरकुले यांच्या नेतृत्वात चौफुली राजूर बायपासवर टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडले.
  • दुधाचे टँकर संभाजीनगरहून जालना मार्गे बुलढाण्याकडे जात असताना टॅंकर अडवून १० हजार लिटरपेक्षाही अधिक दुध रस्त्यावर सोडण्यात आलं.