Lok sabha 2019 : काँग्रेसची चौथी उमेदवारी यादी जाहीर; 27 जणांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 27 जणांचा सामवेश आहे. त्यात केरळच्या 12, उत्तर प्रदेशच्या सात, छत्तीसगडच्या पाच, अरुणाचल प्रदेशच्या दोन आणि अंदमान निकोबारच्या एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम टुकी यांना अरुणाचल प्रश्चिम आणि शशी थरुर यांना तिरिवनंतपूरममधून उमेदवारी देण्यात आली आहे. अर्नाकुलममधून तिकीट मिळाले नसल्याने माजी केंद्रीय मंत्री के. व्ही. थॉमस यांनी नाराजी व्यक्त करत पक्षावरच टीका केली आहे.

याआधी काँग्रेसने तीन उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील 54 उमेदवारांचा समावेश होता. काल जाहीर झालेल्या यादीत केरळच्या 12 जागांचा समावेश आहे. अर्नाकुलमममधून हिबी ईडन यांना तिकीट देण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री के. व्ही. थॉमस यांना या जागेवर तिकीच मिळाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षावरच टीका केली आहे. या यादीत उत्तर प्रदेशच्या सात, छत्तीसगडच्या पाच, अरुणाचल प्रदेशच्या दोन आणि अंदमान निकोबारच्या एका जागेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.