
ब्रिटनमध्ये आपल्या नवजात बालकाला गदागदा हलवत त्याची 28 हाडे मोडून त्याचा जीव घेणाऱ्या नराधम पित्याला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ली वर्नन (21) असे त्याचे नाव आहे.
ब्रिटनमधील केंट येथील ही गेल्या वर्षी जुलै महिन्यातील घटना आहे. येथील न्यायालयाने 29 नोव्हेंबरला ली वर्ननला दोषी ठरवत 16 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ली ने दोन वेळा बाळाला मारहाण केली होती. त्यानंतर बाळाची तब्येत अचानक बिघडल्याचे वर्ननने डॉक्टरांना सांगितले होते. पण डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. त्यावेळी बाळाची वैद्कीय तपासणी केल्यानंतरचे रिपोर्ट व वनर्नने दिलेला जबाब यात तफावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला.
यामुळे वर्ननला पोलिसांनी अटक केली. त्याआधी पोलिसांनी वर्ननचे फेसबुक चेक केले होते. त्यात त्याने आपण बाळाला गदागदा हलवल्याने त्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले होते.





























































