
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची कडक शिस्त पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एका वकिलाने त्यांच्या याचिकेच्या लिस्टिंगवरून आवाज चढवल्यामुळे सरन्यायाधीश प्रचंड भडकले. त्यांनी तिथल्या तिथे वकिलाला कानपिचक्या दिल्या. हळू आवाजात बोला, नाहीतर कोर्टाबाहेर काढेन. आवाज चढवून मला घाबरवाल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. माझ्या 23 वर्षांच्या करीयरमध्ये अशाप्रकारे आवाज चढवून कुणी माझ्यावर दबाव टाकू शकले नाही. माझ्या करीयरच्या शेवटच्या टप्प्यातही मी ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी वकिलाची बोलती बंद केली.




























































