
मध्य प्रदेशातील पन्नाच्या खाणीत एका मजुराचे नशीब चमकले. हिरापूर येथे राहणाऱया अरविंद कादर या मजुराला जेम क्वालिटीचा हिरा सापडलाय. त्याची पिंमत 25 लाख रुपये आहे. अरविंदने सरकारी कार्यालयात अर्ज केला आणि एक हिरा खदानचा पट्टा घेतला. दिवसरात्र मेहनत करून अरविंदने 5 कॅरेट 70 सेंटचे रत्न शोधले. हा महागडा हिरा त्याने सरकारी कार्यालयात जमा केला. जेम क्वालिटीचा हा हिरा आगामी लिलावात विक्रीसाठी ठेवला जाईल, असे हिरा विभागाचे अनुपम सिंह यांनी सांगितले.




























































