
रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका मातेने आपल्या चार मुलांना विहीरीत ढकलून उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
महाड तालुक्यातील खरवली बोरगाव येथील हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी मातेने आपल्या चार मुलांना घेऊन विहीरीत उडी घेतली. या घटनेत चारही मुलांचा बुडून मृत्यू झाला असून आई मात्र बचावली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.































































