महाराष्ट्र बँकेतील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्त जागा तातडीने भरा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र बँकेतील कर्मचाऱ्यांनी शनिवारी आझाद मैदान येथे धरणे धरले होते. महाबँकेत लिपिक आणि शिपाई पदाच्या अनेक जागा रिक्त असून त्यावर भरती केली जावी, अशी बँकेतील सर्वच कर्मचारी संघटनांची मागणी आहे. येत्या 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांचा संप करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.