
दिवसभरात कोरोनाचे 13 हजार 165 नवे रुग्ण आढळले आहेत. 9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱयांचे प्रमाण 71 टक्क्यांवर गेले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 46 हजार 881 रुग्ण बरे झाले असून सध्या 1 लाख 60 हजार 413 रुग्णांकर उपचार सुरू आहेत. राज्यात बुधवारी 346 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.
मुंबईत दिवसभरात 1,132 नवे रुग्ण; 46 जणांचा मृत्यू, 864 कोरोनामुक्त
मुंबईत बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 1,132 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 864 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयाची संख्या आता 1 लाख 6,057 वर पोहोचली आहे. मुंबईत 46 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 265 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 17 हजार 917 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 6 लाख 71 हजार 888 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 31,542 वर पोहोचली आहे. दरम्यान, धारावीत बुधवारी 4 रुग्ण सापडले असून माहीममध्ये 26 तर दादरमध्ये 39 रुग्ण सापडले आहेत.


























































