राज्यातील निर्बंध शिथिल; पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, मैदाने, उद्याने पुन्हा खुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी रात्री घेतला. नवीन मार्गदर्शक सूचना जारी करताना उद्या मंगळवारपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले असून राज्यातील पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, मैदाने पुन्हा खुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे रेस्टॉरंट, सिनेमागृहे, नाटय़गृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देतानाच लग्नसोहळय़ात 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यभरात निर्बंध शिथिल करताना स्थानिक प्रशासनालाही यामध्ये आवश्यकतेनुसार काही बदल करण्याचे अधिकार दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

स्थानिक प्रशासनाला अधिकार

  • रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्याचा स्थानिक प्रशासनाला अधिकार.
  • क्रीडांगणात स्पर्धा तसेच अन्य स्पर्धांसाठी 25 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्याचा अधिकार.
  • राज्य सरकारने 8 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान जारी केलेल्या निर्बंधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार.
  • स्थानिक पर्यटनस्थळे निर्बंधासह सुरू करण्याचा अधिकार.
  • आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीवरील सर्व निर्बंध शिथिल.
  • स्विमिंग पूल्स, वॉटरपार्क 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी.
  • भजन, स्थानिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेने परवानगी.
  • खुल्या मैदानातील लग्नसोहळ्यात क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीला परवानगी, बंद सभागृहांतील लग्नांत 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी.