
प्रभादेवी विभागातील नर्दुल्ला टँक मैदान आता सिध्दिविनायक मंदिराच्या पार्ंकगच्या नावाखाली हडप करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत केला.
विधानसभेत 293च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी या विषयाकडे सभागहाचे लक्ष वेधले. प्रभादेवीत नर्दुल्ला टँक हे एकमेव मैदान शिल्लक राहिले आहे ते सिध्दिविनायक मंदिर पार्ंकगच्या नावाखाली हडप करण्याच्या मागे आहे. यापूर्वी मेट्रो रेल्वेने पंचवीस ते तीस टक्के जागा ताब्यात घेतली आहे. पण ते सामाजिक कामासाठी असल्यामुळे लोकांनी विरोध केला नाही. पण आता बाहेरून येणाऱया लोकांसाठी मैदानात भूमिगत पार्ंकग करीत आहेत. त्यात उर्वरीत उद्यानाचा वीस टक्के भाग जाणार आहे. त्या शेजारी रवींद्र नाटय़ मंदिर आणि मोतीलाल ओस्वालमध्ये भव्य पार्ंकग आहे ती रिकामी पडली आहे. ती जागा सिध्दिविनायक मंदिराला द्यावी अशी मागणी महेश सावंत यांनी केली.






























































