माहीममध्ये आज मोफत अँटिजेन चाचण्या, जी/उत्तरमध्ये कोरोनाविरोधात जोरदार मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी जी/उत्तर विभागात आता जोरदार मोहीम राबवली जात असून मुंबई महानगरपालिकेतर्फे दादर आणि माहीममध्ये मोफत अँटिजेन चाचण्या करण्यात येत आहेत. उद्या माहीममध्ये दोन ठिकाणी मोफत अँटिजेन चाचण्या केल्या जाणार आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागात आता अधिक जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. दादर आणि माहीममध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे आता अँटिजेन चाचण्या सुरू केल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

उद्या माहीममध्ये माहीम प्रसूतीगृह येथे सकाळी 10 ते 11.30 आणि वेलकरवाडी दवाखाना येथे सकाळी 11.30 ते 1 वाजेपर्यंत मोफत अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.