निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान ठरवू- ममता बॅनर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । विशाखापट्टनम

भाजपविरोधात एकत्र आलेले सर्व विरोधी पक्षांच्या महागठबंधनचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. भाजपकडून महागठबंधनला सतत पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून सवाल केले जात आहे. याबाबत सांगताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान ठरवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘मोदी कोण आहेत जे आम्हाला सतत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत प्रश्न करतात. आम्हाला आमचा नेता निवडता येतो. निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही तो ठरवूच’असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. विशाखापट्टनम येथे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सभा आयोजित केली असून त्या सभेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित आहेत.