
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये मंगळवारी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पदयात्रा काढली आणि नंतर एका सभेला संबोधित केले. ममता यांनी भाजपला आव्हान दिले आहे की, भाजपने बंगालमध्ये 30 जागा जिंकून दाखवाव्यात आणि नंतर 294 चे स्वप्न पाहावे.
ममता बनर्जी म्हणाल्या की भाजपवाले दर आठवड्याला फाइव स्टारमधलं अन्न खातात आणि आदिवासींसोबत जेवत असल्याचे दाखवतात. आम्ही 365 दिवस गुरुदेव रवींद्र नाथ टैगोरांच्या सोबत आहोत,मात्र भाजप दर दिवशी खोटे व्हिडीओ पसरवून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे.
ममता यांनी पंतप्रधान मोदींना देखील लक्ष्य केलं. त्या म्हणाल्या कुणीतरी आता नवं रुप धारण केलं आहे. कधी ते टागोर बनू इच्छितात तर कधी गांधीजी. भाजपवाले केंद्रीय एजेंसी आणि पैशांचा वापर करून बंगालमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत.
ममता यांनी भाजपला आव्हान दिले आहे की आधी 30 जागा जिंकून दाखवा 294 जागा जिंकण्याचे स्वप्न नंतर बघा. शेतकऱ्यांच्या मुद्दयावर देखील ममता यांनी भाजपला घेरले.
ममता म्हणाल्या की, ‘दिल्लीहून भाजपचे नेते येतात, ज्यांना गुरुदेवांबद्दल काही माहीत नाही. ते म्हणतात की गुरुदेव शांतिनिकेतन मध्ये जन्मले.’ ममता यांनी आरोप लगाया की, आज विश्व भारतीच्या यूनिव्हर्सिटीला राजकारणात ढकलले जात आहे. बंगालमध्ये द्वेषाच्या राजकारणाला हवा दिला जात असून हिंदू धर्माला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या की, ‘निवडणुकीच्या आधी भाजप इथे पैसा ओतत आहे, ते पैसे वाटत असतील तर घ्या पण मत मात्र आम्हालाच द्या.’ ममता म्हणाल्या की भाजप आता राष्ट्रगीत देखील बदलण्याचा प्रयत्न करत आहे. बंगालच्या संस्कृतीवर निशाणा साधला जात आहे. काही आमदार खरेदी करून ते तृणमूला तोडतील असे त्यांना वाटते मात्र असे होणार नाही.
यासभे आधी ममता बनर्जी यांनी पाच किमी पदयात्रा केली, ज्यामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. याच ठिकाणी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो केला होता.





























































