
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकलसमोर उडी मारून पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना आज विद्याविहार रेल्वे स्थानकात घडली. प्रकाश सदाशिव गायकवाड (35) असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
प्रकाश हा विद्याविहार परिसरात आई, बहीण आणि भावासोबत राहत होता. तो कुर्ला येथे दारूच्या दुकानात कामाला होता. आज सकाळी अकरा वाजता तो विद्याविहार स्थानकात आला. त्याने विद्याविहार येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणार्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच कुर्ला रेल्वे पोलीस तेथे गेले. त्याच्याकडे एक ओळखपत्र सापडले त्यावरून त्याची ओळख पटली. प्रकाशच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून प्रकाशचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. नेमके त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

























































