मन की बात-स्मार्ट व्हिलेजेस बनवा, सर्व समस्या सुटतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. आता घोषणांचा पाऊस आम्हा मतदारांवर पडणार हे निश्चित. पण क्रीडापटू म्हणून मला असे वाटते की, केंद्रातील नव्या सरकारने देशभरात स्मार्ट व्हिलेजेस विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवावी आणि पूर्ण करावी. देशातील जनतेच्या बहुतांश समस्या त्यामुळे सुटतील आणि खेळासोबतच रोजगार, शेती, शिक्षण या सर्व बाबी गावातच मिळाल्याने शहराकडे येणारे लोकांचे लोंढे थांबतील अशी अपेक्षा आहे. सर्वांनाच आपल्या व्यक्तिगत विकासासाठी शहरात येणे शक्य होत नाही. म्हणूनच स्मार्ट सिटीजच्या धर्तीवर आता सरकारने गावागावांत ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना राबवावी. शहरात लोकांची गर्दी वाढली, त्यामुळे नागरी सुविधांचे पार बारा वाजल्याची तक्रार आपण करतो आणि निवडणूक संपली की सर्व विसरून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे वागतो, ही खंत आहे.दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार