फटाके फोडल्याने आला राग, माथेफिरुन पाच मुलांवर अ‍ॅसिड फेकले; एकजण गंभीर

हरिद्वारच्या लक्सरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीनिमित्त मुलं फटाके फोडत असल्याने संतापलेल्या एका माथेफिरुने मुलांवर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत पाच मुलं होरपळली असून एकाची अवस्था गंभीर आहे. संतप्त जमावाने आरोपीला पकडून त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही घटना भिक्कमपूर जितपूर गावची आहे. मंगळवारी रात्री जवळपास नऊच्या सुमारास 14 ते 15 वयोगटातील दहा ते पंधरा मुलं दिवाळीची आतिशबाजी करत होते. त्याच दरम्यान जवळ राहणारे गोवर्धन उर्फ दिलेराम यांनी मुलांना फटाके फोडू नका असे सांगितले. मुलांनी सांगूनही न ऐकल्याने संतापलेल्या त्या व्यक्तीने त्याच्या घराच्या छतावरुन एका कॅनमध्ये असलेले अ‍ॅसिड त्यांच्यावर फेकले. ते त्या मुलांच्या अंगावर पडले.

अचानक मुलांचा किंचाळण्याचा आवाज ऐकून लोकं आवाजाच्या दिशेने धावू लागली आणि एकच गोंधळ पसरला. यामध्ये त्यामध्ये शेर सिंग, बहादूर, बालेश आणि लाहोर सिंग यांचा जखमींमध्ये समावेश होता. त्यांना तत्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांनी चार मुलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवले. तर त्या 50 टक्के जळालेला सौरभ (15) याला हायर सेंटर रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी आरोपी गोवर्धला पकडून बेदम चोपले आाणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक राजीव रौथाण यांनी आरोपीविरोधात संबंधीत कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.