
सामना प्रतिनिधी । मुंबई
सासरेबुवा आणि जावई यांच्यातील प्रेम आणि युद्ध यावर प्रकाश टाकणारी हलकीफुलकी मालिका ‘मंगलम दंगलम’ येत्या 13 नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी 7.30 वाजता फक्त सोनी सब वाहिनीवर सुरू होत आहे. ही मालिका नवरा अर्जुन आणि सासरे संजीव सकलेचा यांच्याभोवती फिरताना दिसेल. अर्जुन हा संजीव यांना त्यांच्या मुलीसाठी आपणच कसे सर्वोत्तम आहोत, हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो, तर संजीव यांना वाटत असते की, त्यांच्या मुलीला जगातील सर्वात चांगला मुलगा मिळाला पाहिजे. अर्जुनची व्यक्तिरेखा करणवीर शर्माने केली आहे, तर संजीव यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी आहे. मनीषा रावत हिने संजीव यांच्या मुलीची रुमी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. याव्यतिरिक्त अंजली गुप्ता, अनिता कुलकर्णी, अभय कुलकर्णी, शुभा खोटे, कृतिका शर्मा, प्रविष्ट मिश्रा आदींनी मालिकेत काम केले आहे.



























































