सलाईनमधून विष देण्याचा, एन्काऊंटर करण्याचा डाव; मनोज जरांगे-पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. त्यामुळे मी सलाईन घेणेही बंद केल्याचा मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

जरांगे-पाटील पुढे म्हणाले की, मी कुठल्याही पक्षाचा नाही आणि कुठल्या पक्षासाठी काम करत नाही. मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न कोणीतरी बघतंय. हे सगळे देवेंद्र फडणवीस करत आहेत. याच्यात एकनाथ शिंदे, अजित पवारांचेही लोकं आहेत. ते सगेसोयऱ्यांचा निर्णय होऊ देत नाहीत आणि 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादण्याचा प्रयत्न होतोय.

आपली मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे. त्यामुळे मला संपवण्यासाठी, गेम करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे. उपोषणात मारण्यासाठी सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे, त्यामुळे सलाईन घेणेही बंद केले. माझा एन्काउंटर करण्याचे फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्यांना एवढीच खुमखुमी असेल तर बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा, असे आव्हान जरांगे-पाटील यांनी दिले.

मुलभूत सुविधांसाठी मुंबईकर दयनीय, भाजप-मिंधे सरकारची डोळेझाक; आदित्य ठाकरेंचा घणाघात

माझा बळी घ्यायचा असेल तर मी तयार आहे, पण समाजाशी बेईमानी करणार नाही. मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण हवे असून तेच घेणार. 10 टक्के आरक्षण घेणार नाही, असेही जरांगे-पाटील ठणकावून म्हणाले.

लहान पक्षांना संपवायचे, मोठ्यांना फोडायचे ही बावनकुळेछाप भाजप नेत्यांची भूमिका महाराष्ट्र व देशाला घातक!