मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उद्यापासून पुन्हा उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पाच पिढय़ा बरबाद झाल्या. आता लढाई आरपारचीच होणार! मंडपात, सावलीत नाही तर मराठा आरक्षणासाठी 30 मे रोजी सकाळी 10 वाजता रखरखत्या उन्हात बाजेवर उपोषणाला बसणार. उपोषणाला बसल्या क्षणापासून अन्नपाण्याचा त्याग करणार आहे. उष्माघाताने माझा बळी गेला तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील, असा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.