मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंदा येथे रास्तारोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाच्या सरसकट कुणबी दाखले मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंदा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीगोंदा शहरासह संपूर्ण तालुका बंद करण्यात येऊन मंगळवारी सकाळी काष्टी येथे तिन तासा पेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ.बबनराव पाचपुते यांनी सांगितले की 1991 साली मी मंत्री असताना माझ्या दालनात मराठा आरक्षणाची बैठक झाली होती. या बैठकीचा मी एक सदस्य असल्याने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक अहवाल तयार करून शासनाला पाठविला होता. तेंव्हा पासून आज पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षणावर दोन दिवसात योग्य तो निर्णय न झाल्यास मी सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीगोंदा येथे होणाऱ्या साखळी उपोषणात सहभागी होणार.

माजी आमदार राहुल जगताप यांनी बोलताना सांगितले की झोपलेल्या सरकारने योग्य वेळी योग्य दखल न घेतल्याने मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ आणली. आता आक्रमक झालेला मराठा समाज थांबणार नाही. जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावो गावी आंदोलनाची तीव्रता वाढवून या झोपलेल्या सरकारला जाग आणून देण्याचे काम करण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना मराठा आरक्षणावर मीडिया समोर बोलताना आपल्याला बोलायचे आणि निघून जायचे असे बेताल वक्तव्य करतात. परंतु त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या साखळी उपोषणात मी सुद्धा सहभागी होऊन उपोषण करणार, असं म्हटलं आहे.

यावेळी घनश्याम शेलार, टिळक भोस, मनोहर पोटे, दीपक भोसले, राजेंद्र नागवडे ( आप), राजेंद्र म्हस्के, अरुण पाचपुते, चांगदेव पाचपुते, शशी जाधव, संजय काळे, अरविंद कापसे, सुदाम कुटे, संतोष इथापे, श्याम जरे, बाळासाहेब बळे, अजीम जकाते, दिलीप लबडे, गोकुळ फराटे, यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, कैलास पाचपुते, अरुण पाचपुते, राकेश पाचपुते, प्रताप पाचपुते, सुनील दरेकर, अनिल कोकाटे, योगेश भोईटे, बंडूतात्या जगताप, दीपक भोसले, विठ्ठल काकडे, आबासाहेब जगताप, राजेंद्र म्हस्के, सतिष मखरे, सुवर्णा पाचपुते, संगीता मखरे, गणेश भोस, मिलींद दरेकर, वैभव पाचपुते, भारती इंगवले, माया खेंडके, अरविंद कुरुमकर यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होता.