
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या प्रत्येक भाविकांच्या हृदयात वसलेल्या श्री देव मार्लेश्वरची पत्नी देवी गिरीजादेवीचे काल रात्री 10. 15 वाजता मोठ्या उत्साहात सर्व मानकरी भक्तगण यांच्या उपस्थितीत मंदिरात आगमन झाले.
14 तारखेला श्रीदेव मार्लेश्वर देवाबरोबर संक्रांतीला दुपारी एक वाजता लग्न सोहळा पार पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ : ४५ वाजता मार्लेश्वर नगरीतून माहेरी येण्यास निघाली आणि कडेकपारीतून अंतर पार करून साखरपा येथे आली. गिरजदेवीचा गजर करीत भक्त गणांनी सारा परिसर भक्तमय केला. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी अशी ख्याती आहे.
यावेळी गिरजादेवीचे मानकरी सम्पूर्ण शेट्ये परिवार पोतदार , पाटेकर ,चव्हाण, झगडे ,पाथरे, किर , राऊत, चव्हाण,मांडवकर थरवळ, लिंगायत,पोटफोडे आदी सर्व मानकरी उपस्थित होते.

































































