ऐकावं ते नवलच! बायकोच्या परवानगीने तरुण करतोय दोन प्रेयसींशी लग्न

जर्मनीत एक आगळीवेगळे प्रकरण समोर आले आहे. बायकोच्या परवानगीने तरुण दोन प्रेयसींशी लग्न करणार असल्याची घटना घडली आहे. या अनोखे प्रकरण सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे. तर काहींनी बायकोच्या परवानगीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

जर्मनीच्या कोलोन शहरातील हे प्रकरण आहे. मिररच्या वृत्तानुसार 35 वर्षीय मार्को सॅन्टो सिल्वाचे डेनिअल नावाच्या तरुणीशी 2012 साली विवाह केला. मात्र मार्कोने नुकतेच बायकोच्या परवानगीने दोन प्रेयसींशी लग्न करणार असल्याचे जाहीर केले आणि सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. 2019 साली मार्कोची भेट जेसिका आणि कामिला या तरुणींशी झाली. तिघांमध्ये ओळख झाल्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मार्कोने आपल्या दोन्ही प्रेयसींची भेट बायकोशी घालून दिली. त्यानंतर चौघेही एकमेकांमध्ये खूप मिसळले.

मार्को आणि डॅनिएला दोन मुले आहेत. असे असूनही, मार्कोला दोघींसोबत नाते वाढवायचे आहे. तसेच मार्को म्हणतो की तो जेसिका आणि कमिलाबरोबर लग्न करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पण मार्कोच्या आनंदावर कोणी विरजण टाकू नये अशी त्याला भीती आहे. कारण बऱ्याच पुरुषांना त्याच्या या नात्याबाबत हेवा वाटत आहे. म्हणूनच त्याला प्रत्येक पाऊल सावधतेने उचलायचे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जगात सगळ्याच गोष्टींचा स्विकार होतो असे नाहीय. त्यामुळे त्याला भिती आहे की त्याच्या नात्यामुळे मुलांना शाळेत किंवा शाळेच्या बाहेर कोणी धमकावयाला नको.

मार्कोचे दोन प्रेयसींशी लग्न हा त्यांच्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच मार्को, जेसिका आणि कामिला हे तिघंही जगात त्यांचे नाते अनोखे असल्याचा दावा करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या