श्रीविशाल गणेश मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सारा परिसर भक्तीमय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar atharvashirsha-pathan

नगर शहराचं ग्रामदैवत श्रीविशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सौ. संगीता देऊळगांवकर, सौ. शारदा होसिंग, अमृता बेडेकर, ऋतुजा पाठक, स्वप्ना बेडेकर, दिप्ती शुक्रे, स्नेहल झांबरे, मेघा बकरे, श्रद्धा देऊळगांवकर, चैताली जावळे, सोनम गाडळकर आदिंनी अथर्वशिर्ष पठणास प्रारंभ केला. यावेळी रेखा झंवर, आशा पुंड, मिनाक्षी सैंदाणे, वर्षा मारवाडी, लिना पंडा आदि महिलांनी शंखनाद केला.

या अथर्वशीर्षाचे नियोजन ऋषीकेश आगरकर, हर्षल फुलारी, गणेश राऊत आदिंनी केले. या अथर्वशीर्ष पठणामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वेशभुषा, एक ताल-सुरात अथर्वशीर्षानं परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी भक्ती गीते सादर करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रातिनिधिक स्वरुपात महिलांचा सन्मान केला, त्यानंतर महाआरती करून प्रसाद वाटपाने सांगता झाली.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, गजानन ससाणे, रंगनाथ फुलसौंदर, संजय चाफे, प्रा.माणिकराव विधाते, नितिन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील वेदशास्त्री मुकुंदशास्त्री मुळे उपस्थित होते.