फडणवीसांच्या सभेत गोंधळ, आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाजातील तरुण आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील लोहा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. फडणवीसांचे भाषण सुरू असतानाच मातंग समाजाच्या तरुणांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करून मातंग समाजाला न्याय देण्याची घोषणा केली. ‘अनुसूचित जातीमधील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गीकरणाची अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी’, ‘सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा सात ते आठ तरुणांनी दिल्या.