मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) मास्टर ऑफ का@म्प्युटर ऑप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ही प्रवेश परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन होणार आहे. एमसीए अभ्यासक्रम तीन वर्ष कालावधीचा व सहा सत्र असलेला असून यावर्षीपासून प्रथमच सीबीसीएस पद्धतीने सुरू होत आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील अनेक महाविद्यालयांत अध्ययन केंद्रे आहेत. यामध्ये प्रात्यक्षिक घेतले जातात. दरवर्षी नोकरी करणारे 400 ते 500 विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. या अभ्यासक्रमात बारावी किंवा पदवी अभ्यासक्रमात गणित हा विषय असलेले सर्व शाखेतील पदवीधर विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यानी अंतिम वर्षाची परीक्षा दिली असेल व त्यांचा निकाल प्रलंबित असेल या विद्यार्थ्यांनाही ही प्रवेश परीक्षा देता येईल. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज http://idolmca.digitaluniversity.ac/#/ या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असून विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा लॅपटॉपवरून प्रवेश परीक्षा देता येईल.




























































