
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्हयातील मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक व मेळाव्याचे गुरूवार 9 मे रोजी आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे, महासचिव मधुकर मेहेत्रे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य विजयकुमार ठुबे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्याने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेश इथापे यांनी केले आहे.
मराठा सेवा संघ व इतर कक्षांचे कामकाज यापुढे आणखी जोमाने व तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, नोकर्या, व्यवसाय मुल-मुलींचे विवाह व इतर सर्व प्रश्न समाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून सोडवण्यासाठी तसेच कार्यकारणीचे नुतणीकरण करण्यासाठी गुरुवार दि. 9 मे रोजी सायंकाळी 6.00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार, स्टेशन रोड, नगर येथे मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यासाठी जिल्हयातुन जूने अनुभवी, पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटक, मार्गदर्शक तसेच जिल्हयातील सर्व नगरपालिका नगरपंचायती, ग्रामपंचायती व इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील समाज बांधवांनी सदर मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे सुरेश इथापे यांनी केले आहे.

































































