पालिकेच्या सुरक्षा दलात 1465 पदांची मेगाभरती

पालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच 65 सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि 1400 सुरक्षा अधिकारी पदांची मेगाभरती होणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही माहिती दिली.

पालिकेच्या सुरक्षा दलाचा 58 वा वर्धापन दिन शुक्रवारी भांडुप संकुल येथे सुरक्षा दल प्रशिक्षण पेंद्रात पार पडला. याप्रसंगी सुरक्षा दलामार्फत संचलन, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध स्पर्धा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱया कर्मचारी व अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुधाकर शिंदे यांनी, ‘विविध ठिकाणी सेवा बजावणाऱया सुरक्षा दलासाठी अद्ययावत सेवा व सुविधा तसेच गणवेश, आवश्यक उपकरणे आदी पुरविण्यात येतील’ अशी माहिती दिली.