
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #MeToo या कॅम्पेनअंतर्गत लगावलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर नाना पाटेकर हे आपला आगामी चित्रपट ‘हाऊसफुल 4’ मधून बाहेर पडले आहेत. तनुश्रीने नाना यांच्यावर 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. गुरुवारी ओशिवरा पोलीस स्थानकात तिने आपला जबाब नोंदवला होता.
तो माझ्याकडे बिकीनीतले फोटो मागायचा! आता साजिद खानवरही लैंगिक शोषणाचे आरोप
#MeToo अक्षय कुमारच्या इशाऱ्याने खानाची टरकली
दरम्यान, ‘हाऊसफुल 4’ चा दिग्दर्शक साजिद खान यांच्यावरही एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यानंतर अभिनेता अक्षय कुमार याने लैंगिक अत्याचाराचा आरोप असणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करणार नसल्याचे सांगत ‘हाऊसफुल 4’चे शूटिंग थांबवले होते. साजिद खान याने जोपर्यंत मी निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत दिग्दर्शकाची भूमिका सांभाळणार असे म्हणत ‘हाऊसफुल 4’मधून काढता पाय घेतला.




























































