
सामना ऑनलाईन, पाटणा
लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती हिने भाजपचे मंत्री राम कृपाल यादव यांचे हात छाटून टाकावेसे वाटतात असे वादग्रस्त विधान केले आहे. रामकृपाल यादव हे केंद्रीय मंत्री असून पूर्वी ते चारा कापणी यंत्रावर काम करायचे. ‘आम्हाला त्यांच्याबद्दल आदर होता मात्र ज्या दिवशी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली त्या दिवशी चारा कापायच्या यंत्राने त्यांचे हात छाटून टाकावेसे वाटले’ असं मीसा भारती म्हणाल्या आहेत
रामकृपाल यादव हे पूर्वी राष्ट्रीय जनता दलात होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पाटलीपुत्र मंतदारसंघात मीसा भारती यांचा पराभव केला होता. या पराभवाचं शल्य अजूनही मीसा भारती यांना सतावत आहे. त्यांचे शल्य आणि पराभूत झाल्याबद्दलचा राग राजदच्या एका बैठकीमध्ये उफाळून आला आणि त्यांनी रामकृपाल यादव यांचे हात छाटण्याचे विधान केले.



























































