
भिशीच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी एकाला दोन वर्षानंतर साकीनाका पोलिसांनी अटक केली. संपत शेजवळ असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
तक्रारदार हे अंधेरीच्या साकीनाका परिसरात राहतात. त्याच परिसरात शेजवळदेखील राहत असून तो चालक म्हणून काम करतो. 2000 ते 2007 या काळात संपत आणि 20 जणांनी महिन्याला पाच आणि दहा हजार रुपयांच्या दोन भिशी सुरू केल्या होत्या. त्या भिशीमध्ये तक्रारदार याच्यासह 20 जणांनी पैसे गुंतवले होते. शेजवळने भिशीचे पैसे आणि व्याज त्या 20 जणांना दिले नाही. त्याने ते पैसे काहींना दिल्याचे तक्रारदार याना समजले. त्यानंतर तक्रारदाराने शेजवळ यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. पैशाचा अपहार केल्याप्रकरणी त्याने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलिसांनी शेजवळविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख याच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सर्जेराव शेंडगे याच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शेजवळची माहिती मिळाली. शेजवळला अखेर साकीनाका परिसरातून अटक केली.
























































