पहिल्‍या वर्धापन दिनानिमित्त मित्रोंतर्फे मित्रों क्‍लब, मित्रों अकॅडमी आणि मित्रों ऑन-डिमांड लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीचे शॉर्ट-फॉर्मेट व्हिडिओ अॅप मित्रोंने यशस्‍वी एक वर्ष पूर्ण केले. मित्रों नागरिकांना शॉर्ट व्हिडिओंच्‍या माध्‍यमातून त्‍यांची प्रतिभा दाखवण्‍याची, मते व अभिप्राय शेअर करण्‍याची सुविधा देतो. एक वर्षाच्‍या कालावधीमध्‍ये मित्रों टीव्‍हीला गुगल प्‍ले स्‍टोअरवर 50 दशलक्षहून अधिक डाऊनलोड्सचा प्रतिसाद मिळाला आहे. एक वर्षाच्‍या यशस्‍वी प्रवासासह अॅपने व्‍यासपीठावर मित्रों क्‍लब, मित्रों अकॅडमी आणि मित्रों ऑन-डिमांड हे नवीन उपक्रम आणत प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल केली आहे. हे नवीन उपक्रम क्रिएटर्स व युजर्सदरम्‍यान सहभाग व उत्‍साह निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करतात.

मित्रों टीव्‍हीच्‍या सूक्ष्‍म-उद्योजक निर्माण करण्‍याच्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत मित्रों क्‍लब सेवा ऑफरिंगच्‍या माध्‍यमातून शॉर्ट-फॉर्मेट व्हिडिओ अॅप उत्‍पन्‍न मिळवून देण्‍याच्‍या व्‍यवसायामध्‍ये प्रवेश करत आहे. तसेच क्‍लबच्‍या माध्‍यमातून अॅप क्रिएटर्सना विशेषत: युजर्ससाठी सर्वसमावेशक कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍याची संधी देते. याव्‍यतिरिक्‍त क्‍लबचे सदस्‍य त्‍यांच्‍या आवडत्‍या क्रिएटर्ससोबत थेट संलग्‍न होऊ शकतात आणि त्‍यांना आवडणाऱ्या कन्‍टेन्‍टची निर्मिती करण्‍याची विनंती करू शकतात. म्‍हणून, व्‍यासपीठ निर्मात्‍यांना व्‍यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यास आणि त्‍यांच्‍या प्रतिभेच्‍या माध्‍यमातून उत्‍पन्‍न मिळवण्‍यास प्रोत्‍साहित करते.

मित्रों टीव्‍ही त्‍यांच्‍या युजर्ससाठी मित्रों अकॅडमी व मित्रों ऑन-डिमांड हे दोन आणखी उपक्रम देखील सादर करत आहे. मित्रों अकॅडमीच्‍या माध्‍यमातून क्रिएटर्सना शैक्षणिक व्हिडिओज शेअर करण्‍याची संधी मिळते, ज्‍यामुळे युजर्सना व्‍यासपीठावरून शिकण्‍यास मदत होते. तसेच मित्रों ऑन-डिमांडच्‍या माध्‍यमातून युजर्स ऑन-डिमांड कन्‍टेन्‍टसाठी विनंती करू शकतील, जसे ज्‍योतिष, गाणी, टिप्‍स व हॅक्‍स, वाढदिवस शुभेच्‍छा. मित्रों टीव्‍हीने त्‍यांच्‍या तंत्रज्ञानामध्‍ये देखील सुधारणा केली आहे. त्‍यांचा युजर्स व क्रिएटर्सना अनुकूल इंटरफेस देण्‍याचा मनसुबा आहे. अॅपने तंत्रज्ञानक्षम उपक्रम सादर केले आहेत, जे युजर इंटरफेस सुधारण्‍यामध्‍ये मदत करतील.

पहिल्‍या वर्धापन दिनाबाबत सांगाताना मित्रों टीव्‍हीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक शिवांक अग्रवाल म्‍हणाले, ”मित्रोंच्‍या लाँचपासून प्रेक्षकांनी व्‍यासपीठाला भरघोस प्रतिसाद दिला आहे. आमच्‍या व्‍यासपीठावरील इंटरअॅक्‍शनमध्‍ये लाइक्‍स व फॉलोच्‍या माध्‍यमातून दुप्‍पट वाढ, तर कमेण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून तिप्‍पट वाढ दिसण्‍यात आली आहे.” एक वर्षाच्‍या प्रवासाबाबत सांगताना मित्रों टीव्‍हीचे सीटीओ व सह-संस्‍थापक अनिश खंडेलवाल म्‍हणाले, ”मागील एक वर्ष आमच्‍यासाठी रोलर कोस्‍टर राइड राहिले आहे. आम्‍ही प्रेमाचा भरघोस वर्षाव केलेल्‍या प्रेक्षकवर्गाचे मनापासून आभार मानतो. मित्रोंने प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल केली आहे. आम्‍ही तंत्रज्ञान सुधारणांपासून आमच्‍या व्‍यासपीठावर विविध वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यापर्यंत सर्वसमावेशक राहिलो आहोत. एक वर्ष पूर्ण केल्‍यानंतर आम्‍ही आता उत्‍पन्‍न प्राप्‍त करून देण्‍याच्‍या व्‍यवसायामध्‍ये प्रवेश करत आहोत. या व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून आमचा आमच्‍या निर्मात्‍यांना असे व्‍यासपीठ देण्‍याचा मनसुबा आहे, जो त्‍यांना त्‍यांच्‍या प्रतिभेच्‍या माध्‍यमातून कमावण्‍याची आणि उद्योजक बनण्‍याची संधी देईल.