
>>विजय जोशी
आंबा, फळांचा राजा! कोकणातील हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्धः त्यापाठोपाठ आता केशरनेही बांगला जम बसवला आहे. साधारण हजार रुपयांना डझनभर हापूस मिळतो… पण दहा हजार रुपयांना एक आंबा असे कुणी सांगितले तर आपण नक्कीच त्याला वेड्यात काबू, पण ही किमया भोकर तालुक्यातील भोसी येथील नंदकिशोर गायकवाड या शेतकऱ्याने करून दाखवली आहे. गायकवाड यांच्या मळपात जगातील सर्वात महाग आंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मियाझाकी’ वाणाची आमराई फुलली आहे.
नंदकिशोर गायकवाड हे स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने 2021 मध्ये पुण्याला होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाच ते शेतीमध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगाची माहितीही घेत होते. यात त्यांना ‘मियाज्ञाकी’ या आंब्याच्या वाणाची माहिती मिळाली. जपानमधील मियाझाकी शहरात भरलेल्या एका कृषी प्रदर्शनात या आंत्र्यावद्दलची विस्तृत माहिती मिळाली. गायकवाड गांनी ‘मियाझाकी’ची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या आंब्याच्या कलमाची किंमत साडेसहा हजार रूपये आहे. कमी पाण्यात येणारा हा आंबा आहे.
‘मियाझाकी’ची आमराई करण्याचा निर्णय घेतल्यावर नंदकिशोर गायकवाड यांनी अगोदर आपल्या शेतातील मातीचा पोत तपासून घेतला. सुरुवातीला जपानमधून दहा रोपे मागवली. पत्नी सुमनच्या मदतीने त्यांनी अत्यंत मेहनतीने या रोपांची जतन केले, ‘मियाझाकी’च्या आजूबाजूल इतर फळांची झाडे लावली. गायकवाड यांच्या मेहनतीला यश आले. दोन वर्षांनतर ‘मियाझाकी’ला फळधारणा झाली. या वाणाच्या एका आंब्याची किंमत दहा हजार रुपये आहे.
‘ मैंगो कॉम’
बर ग्राहक ‘मियाइतकी’ आमराई बहरली. पण हा एवढा महाग आंबा येणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. त्याचे उत्तरही नंदकिशोर गायकवाड यांना इंटरनेटने दिले. ‘मैंगो कॉम’ या वेबसाईटवर त्यांनी आंब्याचे फोटो टाकते, देशी वाणापेक्षा हा आंवा बोडा मोठा असती. जगातील बाजारपेठेत ती ‘एग ऑफ सनशाईन’ महणून ओळखला जातो. सुरुवातीला आंब्याचा रंग जांभळा आणि पिकल्यानंतर तो लालसर होतो. आंब्याची चव अतिशय गोड आणि मधूर आहे. सध्या आंब्याची विक्री ते ऑनलाईनच करतात. सौदी अरवमधील एक ग्राहक एप्रिलमध्ये ‘मियाज्ञाकी’ आमराईला भेट देऊन आंबे खरेदी करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
मियाइझाकी’ बरोबरच नंमडकि माईल, बनाना, कोलंबो, केशर आणि दशहरी ऑव्याचीही झाडे आहेत. आंग्याच्या विक्रीतून दरवर्षी साधारण ५० लाख रुपयांचे उत्पन होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मियाझाकी जांबा लालसर केशरी रंगाचा असतो. यामध्ये बिटा कैरोटीन आणि फॉलीक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.
व्हिटॅमिन सी आणि विटमिन ए भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि पचनसंस्थाही सुदृढ ठेवण्यास हा आंवा मदत करती. नुकत्याच नदिड येथील पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात हा आंबा भाव खाऊन गेला.

























































