
पालिकेने नियमावली जाहीर करूनही अनेक बांधकामांच्या ठिकाणी नियमावली पाळली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत केलेल्या तपासणीत सर्व 24 वॉर्डमध्ये आठशेहून अधिक बांधकामांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली आहे, तर सुमारे 600 बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पाच वर्षांनंतर लोअर परळ पूल सुरू झाल्यामुळे परळ, करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळ, वरळी या परिसरातील रहिवासी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, वरळी नाक्याकडे जाणाऱया श्रीराम नाका ते यादव चौक मार्गावर महापालिकेकडून 1800 मिमी व्यासाच्या पर्जन्यवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग देऊन हा मार्ग वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे. हे काम 31 मे 2024 पर्यंत सुरू राहणार असल्यामुळे या परिसरातील रहिवासी आणि वाहनचालकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
























































