अश्लील चॅट, पॉर्न सीडी, तसले टॉय अन् महिलांचे लपून काढलेले फोटो; बाबा चैत्यन्यानंदचे ‘शौक’ जगासमोर, चौकशीतून धक्कादायक खुलासे

दिल्लीत काळे धंदे करणारा स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी याच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. स्वामी चैतन्यानंद हा दुबईतील शेखसाठी मुलींची व्यवस्था करत होता. आश्रमातील विद्यार्थिनी आणि महिलांकडे तो ज्युनियर विद्यार्थिनींची विचारणा करत होता. अश्लील चॅटनंतर आता त्याच्याकडे पॉर्न सीडी, सेक्स टॉय मॉर्फ केलेले फोटो, आणि महिलांचे लपून काढलेले फोटोही आढळले आहेत.

वसंत पुंज येथील आश्रमातील अवैध प्रकार काही विद्यार्थिनींनी उघडकीस आणले होते. त्यांनी 62 वर्षीय स्वामी चैतन्यानंद सरस्वती बाबावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचा आरोप केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला होता. तसेच त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जदेखील दाखल केला होता, मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआऊट नोटीसदेखील जारी केली होती. त्यानंतर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग्रा येथील एका हॉटेलमधून चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्या मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वामी चैतन्यानंद याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून एक फोन जप्त करण्यात आला आहे. त्यात त्याने आश्रमातील विद्यार्थिनींसोबत केलेले अश्लील चॅट्स समोर आले. अनेक मुलींना तो आपल्यासोबत शय्यासोबत करायलाही बोलत होता. एवढेच नाही तर त्यांना महागड्या वस्तू, ब्रँडेड कपडे, दागिने आणि परफ्यूमही देत होता.

दुबईतील शेखला कॉलेजच्या मुली पुरवायचा बाबा चैतन्यानंद, व्हॉट्सअप चॅटमधून खळबळजनक खुलासा

बाबा चैतन्यानंद आश्रमातील विद्यार्थिनींना उत्तराखंड आणि दिल्लीला घेऊन जात होता. काहींना त्याने हिंदुस्थानबाहेर नेल्याचेही समोर आले आहे. तसेच आश्रमामध्ये अश्लील साहित्य आणि व्हिडीओ सापडले असून बाबाच्या खोलीतून सेक्स टॉय, 5 पॉर्न सीडी जप्त करण्यात आल्या होत्या. त्याच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही मॉनेटरिंग अॅपही होते आणि तो हॉस्टेलवर नजर ठेवत होता. तसेच महिलांचे लपून फोटोही काढत होता.