
देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तमाम लोक मिठाईची निवड करतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात तऱ्हेतऱ्हेच्या मिठायांची रेलचेल असते.
सध्या एक मिठाई लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कारण, या मिठाईची किंमत. ही मिठाई 50 हजार रुपये किलो अशा दराने मिळत आहे. विशेष म्हणजे ही मिठाई इतकी महाग असूनही लोक खरेदी करून याचा आस्वाद घेत आहेत.
लखनौमध्ये ही मिठाई मिळत आहे. या मिठाईची खासियत ही की त्यात किन्नौरचे चिलगोजे (पाईन वृक्षाच्या बिया), कश्मिरी केशर, मॅकडामिया नट्स आणि ब्ल्यू बेरीज वापरण्यात आल्या आहेत. त्यावर अस्सल सोन्याच्या वर्खाचं आवरण आहे.
त्यामुळे या मिठाईची किंमत हजारोंच्या घरात गेली आहे. याचा एक तुकडा खाण्यासाठी देखील लोक 500 रुपये मोजताना दिसत आहेत. लखनौच्या बाहेरून देखील या मिठाईला मोठी मागणी आहे.




























































