Mother Dairy milk prices – अमूल पाठोपाठ मदर डेअरीनेही भाव वाढवला, कधीपासून लागू होणार नवीन दर? जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमूल पाठोपाठ मदर डेअरीने सर्वसामान्यांना मोठा झटका आहे. मदर डेअरीने दूधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ 14 मे (गुरुवार) 2026 पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहे. देशातील दोन आघाडीच्या कंपन्यांनी दुधाचा भाव वाढवल्याने महाईने होरपळलेल्या जनतेला चहा पिणेही अवघड होणार आहे.

मदर डेअरीने सर्व प्रकारच्या दूधाच्या दरांमध्ये 14 मे 2026 पासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या दरामध्ये 6 टक्के वाढ झाली असून ग्राहकांवरील भार कमी करण्याचे सर्व प्रयत्न करून ही दरवाढ करणे भाग आहे, असे मदर डेअरीने परिपत्रक जारी करत स्पष्ट केले आहे.

मदर डेअरीचे सुधारित दर (दिल्ली-एनसीआर)

बल्क वेंडेड मिल्क (टोकन मिल्क) – आधी 56 रुपये, आता 58 रुपये
फुल क्रीम मिल्क – आधी 70 रुपये, आता 72 रुपये
टोन्ड मिल्क – आधी 58 रुपये, आता 60 रुपये
डबल टोन्ड मिल्क – आधी 52 रुपये, आता 54 रुपये
गाईचे दूध – आधी 60 रुपये, आता 62 रुपये
प्रो मिल्क – आधी 70 रुपये, आता 72 रुपये

Amul hikes milk prices – अमूल दुधाच्या दरामध्ये वाढ, 14 मे पासून ग्राहकांच्या खिशाला फटका