
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपूरच्या मिहान परिसरात एका चालत्या बसला आग लागल्याने एकच खळवळ उडाली. खासगी कंपनीची ही बस रस्त्यावरून जात असताना अचानक बसच्या इंजीनने पेट घेतला. सुदैवाने बसमध्ये चालका व्यतिरिक्त कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्नीशमन दलाची गाडी घटनस्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली.





























































