
सामना ऑनलाईन । नांदेड
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे पक्षात काहीच चालत नाही की काय असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. एका सभेमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप स्वपक्षीयांवर केला आहे. तसेच चुकीचे वागणाऱ्यांची शिक्षा मला देऊ नका, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
Lok sabja 2019: अशोक चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात रंगतदार लढत
याआधी ‘माझे पक्षात कोणी ऐकत नाही, मीसुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीत आहे’ या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आवाजातील ऑडिओ क्लिपने खळबळ उडवली होती. चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत होते. परंतु काँग्रेसने उमेदवार बदलून कशीतरी समजूत काढली. यानंतर अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये उमेदवारी दिली. त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरू आहे असे वाटत होते. परंतु अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त केल्याने काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे.




























































