
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून गायब झालेल्या सहा खासदारांना तातडीने Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याबाबतचे महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाने निर्देश दिल्याचे पत्र समोर आले आहे. हे खासदार डरपोक असून ऑपरेशन ”तुडवा”चा हा इफेक्ट असल्याची खरमरीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
डरपोक (गांडू) !
ऑपरेशन “तुडवा ” इफ़ेक्ट
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DDWBdkHIVu— Sanjay Raut (@rautsanjay61) June 18, 2026
17 जून 2026 रोजी राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या वायरलेस संदेशानुसार, राज्यातील सर्व संबंधित पोलीस यंत्रणांना या खासदारांना तात्काळ प्रभावाने ‘Y+ (स्थानिक घटक)’ दर्जाच्या समकक्ष सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
सुरक्षा देण्यात येणाऱ्या गायब खासदारांमध्ये संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या खासदारांविरोधात जनमानसांत संतप्त भावना आहेत.


























































